अर्थ मंत्रालय

वर्ष 2019-20 मध्ये वित्तीय तूट 3.8 टक्के आणि वर्ष 2020-21 3.5 टक्के राहण्याचा अंदाज; गुंतवणुकीशी तडजोड न करता वित्तीय दृढीकरणाच्या मार्गावर परत जाण्याची कटिबद्धता


प्रस्तावित आंकडे विश्वासार्ह, पारदर्शक, एफआरबीएम नियमांशी सुसंगत- अर्थमंत्री

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीना मंजुरी

Posted On: 01 FEB 2020 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2020

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत आर्थिक वर्ष 2020-21 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना गुंतवणुकीशी तडजोड न करता वित्तीय दृढीकरणाच्या मार्गावर परत जाण्याची कटिबद्धता व्यक्त केली.

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये वित्तीय तूट 3.8 टक्के आणि वर्ष 2020-21 3.5 टक्के राहण्याचा अंदाज या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. हे आकडे विश्वासार्ह असून हे अनुमान काढतांना  एफआरबीएमच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक आणि आर्थिक गरजांनुसार आणि सार्वजनिक स्रोतांचा अधिकाधिक वापर व्हावा या हेतूने, केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2020-21 साठीच्या भांडवली खर्चात 21 टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दीर्घकालीन आणि अत्यावश्यक अशा पायाभूत वित्तीय कंपन्यांना विशेष निधी म्हणून 22,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या आधारावर वर्ष 2020-21 साठी सकाळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकासदर 10 टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी, सरकारने अलीकडेच महत्वाच्या कर सुधारणा केल्या आहेत,असे सीतारामन यांनी सांगितले.

संघराज्याची भावानं दृढ करण्याच्या दृष्टीने पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या अहवालातील शिफारसींना मंजुरी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar


(Release ID: 1601562)
Read this release in: English