अर्थ मंत्रालय
नव्या कंपन्यांच्या निर्मितीत भारत तिसऱ्या क्रमांकावर
2014 मधल्या 70,000 कंपन्यांच्या तुलनेत 2018 मध्ये 1,24,000 नव्या कंपन्यांची निर्मिती
कारखानदारी क्षेत्रातल्या उद्योजकता घडामोडीत गुजरात,मेघालय, पुद्दुचेरी, पंजाब आणि राजस्थान आघाडीवर
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2020 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2020
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2019- 20 सादर केला.जागतिक बँकेच्या उद्योजकता आकडेवारीनुसार,नव्या कंपन्यांच्या निर्मितीत,भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे असे सर्वेक्षणात म्हटले आहे. 2014 पासून नव्या कंपन्यांच्या निर्मितीत उल्लेखनीय वाढ झाल्याचेही या आकडेवारीवरून दिसत आहे.2006 ते 2014 या काळात औपचारिक क्षेत्रात निर्माण झालेल्या कंपन्यांच्या संख्येचा संचयी वार्षिक वृद्धी दर 3.8 टक्के राहिला तर 2014 ते 2018 या काळात हा दर 12.2 टक्के नोंदला गेला.परिणामी 2014 मध्ये निर्माण झालेल्या 70,000 नव्या कंपन्यांच्या तुलनेत 2018 मध्ये, 80 टक्के वाढ होऊन ही संख्या 1,24,000 वर पोहोचली.
0SUQ.jpg)
उत्पादन,कृषी आणि पायाभूत क्षेत्राच्या तुलनेत, सेवा क्षेत्रात नव्या कंपन्यांची निर्मिती लक्षणीयरीत्या अधिक आहे याची सर्वेक्षणात नोंद घेण्यात आली आहे. सेवा क्षेत्रात सर्वाधिक उद्योजकता दिल्ली, मिझोरम, उत्तर प्रदेश,केरळ,अंदमान निकोबार आणि हरियाणा मध्ये दिसून आली.
भारताचे सर्व जिल्हे आणि उत.पादकता विभाग यांच्यामध्ये निर्माण झालेल्या कंपन्यांच्या संख्येत विषमता असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे मात्र नव्या कंपन्यांची निर्मिती काही जिल्ह्यां पुरती सीमित नसून संपूर्ण देशात ही निर्मिती होत आहे.कोणत्याही जिल्ह्यात साक्षरता आणि शिक्षण उत्तम राहिल्याने स्थानिक स्तरावर उद्योजकतेला प्रोत्साहन मिळते.
जिल्ह्यांतील स्थानिक शिक्षण आणि भौतिक पायाभूत संरचना यांचा स्तर, याचा प्रभाव नव्या कंपन्यांच्या निर्मितीवर होतो याकडे सर्वेक्षणात लक्ष वेधण्यात आले आहे.
उत्पादन, संरचना आणि सेवा क्षेत्र उद्योजकता क्षमतांच्या तुलनेत,कृषी क्षेत्रातल्या उद्योजकता क्षमता, देशभरात बहुतांश जिल्ह्यात समान रूपाने आढळत आहेत. कृषी क्षेत्रातल्या उद्योजकतेत मणिपूर, मेघालय, मध्य प्रदेश, आसाम, त्रिपुरा आणि ओडिशा सर्वात आघाडीवर आहेत.
गुजरात,मेघालय,पुद्दुचेरी,पंजाब आणि राजस्थानमध्ये कारखानदारी क्षेत्रात उद्योजकता सर्वात जास्त असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

आणखी शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती करुन साक्षरता वेगाने वाढवल्याने उद्योजकता घडामोडीना गती येईल आणि स्थानिक पातळीवर संपत्ती निर्मितीला गती येईल.गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली गेल्यास स्थानिक बाजारपेठां पर्यंत पोहोचणे शक्य होऊन उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल असंही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1601348)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English