अर्थ मंत्रालय

आर्थिक सर्वेक्षण 219-20 ची संकल्पना : बाजारपेठ सक्षम करणे, उद्योगाभिमूख धोरणांना प्रोत्साहन आणि अर्थव्यवस्थेत विश्वास मजबूत करणे

Posted On: 31 JAN 2020 5:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2020

 

‘सबका साथ सबका विकास’ या स्वप्नासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात सांगितले होते की, जेव्हा संपत्ती निर्माण होते तेव्हाच त्याचे वितरण करता येईल. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2019-20 मध्ये देशात संपत्ती निर्मितींना चालना देणाऱ्या धोरणाच्या आराखडा निर्मितीचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर वाटचाल करेल.

बाजारपेठ सक्षम करणे, उद्योगाभिमूख धोरणांना प्रोत्साहन आणि अर्थव्यवस्थेत विश्वास मजबूत करणे ही संकल्पना सर्वेक्षणाच्या केंद्रस्थानी आहे.

बाजारपेठेंद्वारे अदृश्य मदत

जागतिक अर्थव्यवस्थेवर भारताच्या ऐतिहासिक वर्चस्वाचे वर्णन करतांना या सर्वेक्षणात बाजारात खुलेपणा आला असून या खुलेपणाच्या महत्वावर भर देण्यात आला आहे, यामुळे संपत्ती निर्मिती होईल आणि त्यातून वाढलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल. बाजाराच्या या अदृश्य हाताला विश्वासाची साथ मिळाल्यामुळे यापूर्वी असे वर्चस्व मिळवता आले होते, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्वेक्षणात संपत्ती निर्मितीची जी संकल्पना आहे त्यात प्राचीन भारतीय परंपरा आणि समकालीन तथ्य यांचा संगम असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी फिनटेकचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1601332) Visitor Counter : 171


Read this release in: English