संरक्षण मंत्रालय
ऑस्ट्रेलियाचे एचएमएएस टुवूम्बा हे राजेशाही नौदल जहाज मुंबई भेटीवर
Posted On:
29 JAN 2020 6:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2020
एचएमएएस टुवूम्बा हे ऑस्ट्रेलियाचे राजेशाही नौदल जहाज सध्या मुंबई भेटीवर आले आहे. कमांडर रे लेग्गट, कमांडर संयुक्त कृती दल (सीटीएफ)-150 आणि कमांडर मिशेल लिविंगस्टोन, कमांडिंग ऑफिसर, एचएमएएस टुवूम्बा यांनी पश्चिमी नौदल कमांडच्या मुख्यालयात व्हाईस ॲडमिरल आर.बी.पंडित यांची भेट घेतली.
एचएमएएस टुवूम्बा सीटीएफ-150 च्या परिचालक नियंत्रणाखाली या क्षेत्रात परदेशी तैनातीवर आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांमधील या व्यावसायिक संवादामुळे उभय देशांमध्ये संबंध अधिक मजबूत होतील तसेच सागरी क्षेत्रात सामाईक हित वृद्धींगत होईल.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1601028)
Visitor Counter : 123