मंत्रिमंडळ

राष्ट्रीय भारतीय वैद्यकशास्त्र आयोग विधेयक, 2019 मध्ये अधिकृत सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 29 JAN 2020 4:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय भारतीय वैद्यकशास्त्र आयोग विधेयक, 2019 (एनसीआयएम) मध्ये अधिकृत सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

या प्रस्तावित कायद्यामुळे भारतीय वैद्यकशास्त्र शिक्षण प्रणालीमध्ये आवश्यक नियामक सुधारणा करणे शक्य होणार आहे. प्रस्तावित नियमांमुळे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे संरक्षण होणार आहे तसेच कामकाजामध्ये पारदर्शकता येणार आहे. याचबरोबर रुग्णावर केलेल्या औषधोपचाराविषयी उत्तरदायित्व निश्चित होवू शकणार आहे. या आयोगाच्यावतीने देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वांना परवडणाऱ्या दरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रोत्साहन दिले जावू शकेल. 

भारतीय वैद्यकशास्त्र प्रणालीमध्ये असलेल्या सर्व वैद्यकीय शिक्षण संस्थांचे शैक्षणिक प्रमाणिकरण, मूल्यांकन, आकलन आणि मान्यता देण्यासंबंधी सर्व कार्ये सुकर व्हावीत यासाठी आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. एनसीआयएमस्थापनेचा मुख्य उद्देश देशामध्ये पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध व्हाव्यात हा आहे. तसेच भारतीय वैद्यकीय प्रणालीत आरोग्य सेवेमध्ये अंतर्भूत होत असलेल्या सर्व गोष्टींचे प्रमाणिकरण करताना उच्च नैतिक मानक ठेवण्यास प्रोत्साहन देणे आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1600957) Visitor Counter : 240


Read this release in: English