श्रम आणि रोजगार मंत्रालय
खाण कामगारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य-संतोष कुमार गंगवार
Posted On:
28 JAN 2020 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2020
खाण कामगारांच्या सुरक्षिततेला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी म्हटले आहे. खाण सुरक्षिततेच्या 12 व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते.
मंत्रालयाने व्यवसायात्मक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची स्थिती यासंदर्भातले विधेयक संसदेत सादर केले आहे. यामध्ये खाण कामगारांची वार्षिक आरोग्य तपासणी, खाण, कारखाना आणि बांधकाम क्षेत्रासाठीच्या सुरक्षा निकषाचा यात समावेश आहे.
खाण क्षेत्र सुमारे 10 लाख लोकांना रोजगार पुरवते तसेच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात खाण क्षेत्राचे 2.6 टक्के योगदान असल्याची माहिती त्यांनी दिली. कामगारांच्या सुरक्षेविषयी महत्वपूर्ण सूचना या परिषदेतून मांडल्या जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1600818)
अभ्यागत कक्ष : 98