पंतप्रधान कार्यालय

उपराष्ट्रपती आणि युरोपियन उच्चालय प्रतिनिधी जोसेफ बोरेल फॉन्टेलेस यांनी पंतप्रधानांशी साधला दूरध्वनीद्वारे संवाद

Posted On: 17 JAN 2020 11:18PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2020

 

जोसेफ बोरेल फॉन्टेलेस, युरोपचे उच्च प्रतिनिधी तसेच उपराष्ट्रपती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. बोरेल 16 ते 18 जानेवारीदरम्यान भारताच्या दौऱ्यावर असून ते रायमाना वार्ता 2020 ला उपस्थित राहून अध्यक्षीय भाषण करतील. 1 डिसेंबर 2019 ला युरोपियन संघराज्याच्या एचआरपीव्ही या पदावर नियुक्त झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच विदेश यात्रा आहे.

पंतप्रधान मोदी यांनी बोरेल यांचे एचआरपीव्ही पदावर नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले असून भविष्यातील योजनांसाठी शुभेच्छा दिल्या.

युरोपीयन संघराज्य आणि भारत हे नैसर्गिक भागीदार असून ते मार्च 2020च्या भारत युरोप उत्पादक परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत हवामान बदल, व्यापार, आर्थिक संबंध या विषयांबाबत भारत युरोपवर अवलंबून असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी पूर्वी युरोपियन आयोग आणि युरोपियन परिषदेशी झालेल्या नेतृत्वाबाबत चर्चेचे पुनर्स्मरण केले.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1600783) Visitor Counter : 92


Read this release in: English