पंतप्रधान कार्यालय
21 व्या शतकात गगनयान ही भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरेल - पंतप्रधान
पंतप्रधानांनी नवीन दशकाच्या त्यांच्या पहिल्या 'मन की बात' मध्ये गगनयान मिशनवर केली चर्चा
Posted On:
26 JAN 2020 10:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2020
पंतप्रधानांनी नवीन दशकाच्या त्यांच्या पहिल्या 'मन की बात'मध्ये गगनयान मिशनवर चर्चा केली.ते म्हणाले की, वर्ष २०२२ मध्ये भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करतांना देशाने “गगनयान’ मोहिमेद्वारे भारतीयांना अंतराळात नेण्याचा संकल्प केला पाहिजे. ”
पंतप्रधान म्हणाले की , “21 व्या शतकात गगनयान मिशन ही भारतासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी ठरेल. न्यू इंडियासाठी हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.”
पंतप्रधानांनी भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची प्रशंसा केली ज्यांची निवड या मिशनसाठी अंतराळवीर म्हणून झाली आहे आणि त्यांचे आगामी प्रशिक्षण रशियामध्ये आहे.
“हे आश्वासक तरुण भारताचे कौशल्य, क्षमता, धैर्य आणि स्वप्नांचे प्रतीक आहेत. आमचे चार मित्र त्यांच्या प्रशिक्षणासाठी काही दिवसांत रशियाला जाणार आहेत. मला खात्री आहे की, भारत-रशिया मैत्री आणि सहकार्याचा हा आणखी एक सुवर्ण अध्याय चालू होईल.”
पंतप्रधान म्हणाले की एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ते देशाच्या आशा व आकांक्षा पार पाडण्याच्या आणि अवकाशात जाण्याची जबाबदारी स्वीकारतील.
ते म्हणाले, "प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर मी या चार तरुणांचे आणि या अभियानाशी संबंधित भारतीय आणि रशियन शास्त्रज्ञ आणि अभियंता यांचे अभिनंदन करतो."
B.Gokhale/P.Kor
(Release ID: 1600781)
Visitor Counter : 156