पंतप्रधान कार्यालय

ऐतिहासिक बोडो कराराचे पंतप्रधानांनी केले स्वागत


या करारामुळे बोडो नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन येणार

Posted On: 27 JAN 2020 6:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 जानेवारी 2020

 

आज झालेल्या ऐतिहासिक बोडो कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. हा करार बोडो जनतेच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणणारा ठरेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

‘या करारामुळे शांतता, सौहार्द आणि एकत्रित भावनेची नवी पहाट उजाडली आहे. भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. बोडो संघटनांसोबत आज झालेला करार त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल.

आज झालेला बोडो करार अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. या करारामुळे विविध हितसंबंधी गट एकत्र आले आहेत.  आजवर जे गट सशस्त्र कारवायांमध्ये गुंतलेले होते ते आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावणार आहेत.

Ushering in a new dawn of peace, harmony and togetherness!

Today is a very special day for India.

The Accord with Bodo groups, which has been inked today will lead to transformative results for the Bodo people. pic.twitter.com/Y0QYlWvYqU

— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2020

Bodo Accord inked today stands out for many reasons.

It successfully brings together the leading stakeholders under one framework.

Those who were previously associated with armed resistance groups will now be entering the mainstream and contributing to our nation’s progress. pic.twitter.com/h7hCRI1o5H

— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2020
या करारामुळे बोडो जमातीच्या लोकांचे संरक्षण होईल तसेच बोडो संस्कृती लोकप्रिय करण्यातही हातभार लागेल. सरकारच्या विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी या करारामुळे बोडोंना मिळेल. बोडो जमातीच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत’, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

 


(Release ID: 1600737) Visitor Counter : 170
Read this release in: English