भारतीय निवडणूक आयोग

10वा राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी रोजी साजरा केला जाणार


मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता ही यंदाची संकल्पना

Posted On: 24 JAN 2020 5:16PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  24 जानेवारी 2020

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2020 रोजी दहावा राष्ट्रीय मतदार दिन आयोजित केला असून राष्ट्रपती राम नाथ कोविंद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. केंद्रीय विधी आणि न्याय, संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे वर्ष भारतीय लोकशाहीच्या इतिहासात महत्वाचे असून निवडणूक आयोग यंदा 70 वर्षे पूर्ण करत आहे.

2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. मतदारांना विशेषत: नव मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे हा या मागचा उद्देश आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविण्याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करणे यासाठी हा दिवस समर्पित आहे.

बिलिफ इन द बॅलट-2 हा देशभरातील 101 अनुभवांचा संग्रह असून प्रकाशन विभागाच्या सहकार्याने विकसित करण्यात आला असून या संग्रहाचे प्रकाशन उद्याच्या कार्यक्रमात होणार आहे. याची पहिली प्रत राष्ट्रपतींना सुपूर्द केली जाईल.

शंभरी पार केलेल्या आणि अतिशय कठीण परिस्थितीत मतदान करणाऱ्या 51 मतदारांच्या कथांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

सर्वोत्तम निवडणूक पद्धतींसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जिल्हा आणि राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना प्रदान केले जातील.

अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, कझाकस्तान, किरगिझ, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, श्रीलंका आणि ट्यूनिशिया या देशांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

‘मजबूत लोकशाही निवडणूक साक्षरता’ ही यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1600442) Visitor Counter : 198
Read this release in: English