भारतीय निवडणूक आयोग

दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या दहाव्या वार्षिक बैठकीचे यजमानपद निवडणूक आयोग भूषवणार

Posted On: 23 JAN 2020 6:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2020

 

केंद्रीय निवडणूक आयोग उद्या 24 जानेवारी रोजी नवी दिल्लीत दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या दहाव्या वार्षिक बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. यानिमित्त संस्थात्मक क्षमता बळकट करण्यासंबंधी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या वार्षिक बैठकीत गेल्या वर्षी सदस्यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेत संस्थेच्या सदस्य देशांव्यतिरिक्त कझाकस्तान, किर्गिस्तान, मॉरिशस, केनिया आणि ट्यूनिशिया देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

निवडणूक आयोगाचे ‘व्हाईस इंटरनॅशनल’ हे त्रैमासिक यावेळी प्रकाशित केले जाईल.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

 (Release ID: 1600369) Visitor Counter : 132


Read this release in: English