मंत्रिमंडळ

भारत आणि ब्राझील दरम्यान बालसंगोपनासंदर्भात द्विपक्षीय सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2020 4:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ब्राझिल दरम्यान बालसंगोपनासंदर्भात द्विपक्षीय सहकार्यविषयक सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. भारताचे महिला आणि बालविकास मंत्रालय आणि ब्राझिलचे नागरिकत्व मंत्रालय यांच्यात हा करार होणे अपेक्षित आहे.

 

लाभ

यामुळे दोन्ही देशांदरम्यान मैत्रीचे बंध अधिक मजबूत होतील आणि बालपणाच्या सुरुवातीच्या काळात घ्यायच्या काळजीबाबत द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत होईल. यातून दोन्ही देशांना सर्वोत्तम पद्धतींच्या आदानप्रदानातून लाभ मिळेल.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1600149) आगंतुक पटल : 174
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English