मंत्रिमंडळ
फौजदारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्यासाठी भारत आणि ब्राझिल यांच्यात झालेल्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
22 JAN 2020 4:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2020
फौजदारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्यासाठी भारत आणि ब्राझिल यांच्यात झालेल्या कराराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
दोन्ही देशातल्या फौजदारी प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर घ्यावा यासाठी परस्पर कायदेशीर सहकार्य तसेच तपास आणि शिक्षेच्या अंमलबजावणीतही परस्पर सहकार्य करणे शक्य होणार आहे. बहुराष्ट्रीय गुन्हेगारी आणि त्याचा दहशतवादाशी असलेला संबंध लक्षात घेता या करारामुळे दोन्ही देशांना अशा प्रकरणांचा सामना करताना व्यापक कायदेशीर आधार मिळू शकेल. गुन्ह्यांचा छडा लावणे, पुरावे, गुन्ह्यांना अटकाव करणे तसेच अशा गुन्ह्यांसाठी विशेषत: दहशतवादी कारवायांसाठी दिला जाणारा निधी रोखणे या करारामुळे शक्य होणार आहे.
S.Tupe/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1600139)