उपराष्ट्रपती कार्यालय

प्राचीन भाषांचा प्रसार आणि संवर्धन ही काळाची गरज- उपराष्ट्रपती


मातृभाषेच्या प्रसारासाठी राष्ट्रीय चळवळ सुरु करण्याचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2020 5:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2020

 

प्राचीन भारतीय भाषांचा प्रसार आणि संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. कारण, त्या आपल्या प्राचीन संस्कृतीचे मूल्य, ज्ञान आणि विद्वता दर्शवणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. मातृभाषेच्या प्रसारासाठी राष्ट्रीय चळवळ सुरु करावी, असे ते म्हणाले. ते आज चेन्नई येथील सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिल (सीआयसीटी) आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ तमिल स्टडीज (आयआयटीएस) ला भेट दिल्यानंतर बोलत होते.  

संस्थेने थिरुक्कूरलचे सर्व भारतीय आणि काही परदेशी भाषांमध्ये भाषांतर करण्याच्या निर्णयाचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. तसेच त्यांनी प्रसिद्ध प्राचीन तमिळ साहित्याचे मानवतेच्या कल्याणासाठी भाषांतर करण्यास सांगितले.  

तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय भाषांचा समृद्ध वारसा जतन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

 

 

S.Thakur/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1599798) आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English