माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एफटीआयआय आणि एसआरएफटीआयमध्ये प्रवेशासाठी यावर्षीपासून उमेदवारांकरिता बहुस्तरीय निवड प्रक्रिया
Posted On:
17 JAN 2020 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2020
SRFTI अर्थात सत्यजीत रे फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट कोलकाता आणि पुण्यातली FTII अर्थात फिल्म ॲण्ड टेलीव्हिजन इन्स्टीट्युट ऑफ इंडिया या चित्रपट निर्मिती आणि दूरचित्रवाणी निर्मिती कला क्षेत्रातल्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी उमेदवारांना यावर्षीपासून बहुस्तरीय निवड प्रक्रिया पार करावी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांना अखिल भारतीय स्तरावरची सामायिक प्रवेश परीक्षा जेईटी 2020 परीक्षा द्यावी लागेल. तीन तासाची ही लेखी परीक्षा देशातल्या 26 केंद्रावर घेण्यात येईल. या परिक्षेतल्या मार्कांच्या आधारावर SRFTI आणि FTII उमेदवारांची दुसऱ्या स्तरासाठी निवड करेल तर तिसऱ्या स्तरावर वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. तीनही स्तरावर यशस्वी ठरणाऱ्या उमेदवाराला 2020 च्या शैक्षणिक वर्षासाठीच्या पूर्णवेळ नियमित अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल. एसआरएफटीआयची सामाईक प्रवेश परीक्षा 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या परिक्षेसंदर्भात माहिती देण्याच्या उद्देशाने देशभरात चर्चासत्रही आयोजित करण्यात आली आहेत.

अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या इतर माहितीसाठी :-
जेईटी संकेतस्थळ - https://applyadmission.net/jet2020
एफटीआयआय संकेतस्थळ- http://ftii.ac.in/
एसआरएफटीआय संकेतस्थळ- http://srfti.ac.in/
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1599719)
Visitor Counter : 105