आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

नॉव्हेल कोरोनाव्हायरसचा चीनमध्ये प्रादुर्भाव : चीनमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना

Posted On: 17 JAN 2020 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2020

 

चीनमध्ये नॉव्हेल कोरोनाव्हायरसचा प्रार्दुभाव आढळला आहे. 11 जानेवारी 2020 पर्यंत या आजाराची 41 प्रकरण आढळली असून एकाचा मृत्यू झाला आहे. ताप हे याचे प्रमुख लक्षण असून काही रुग्णांमध्ये श्वसनाचा त्रासही आढळतो. या आजाराचा प्रसार कोणत्या मार्गाने होतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मानवी संपर्कातून या रोगाचा संसर्ग झाल्याचा ठोस पुरावा नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाचा जागतिक प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे सांगितले असले तरीही खबरदारीचा उपाय म्हणून चीनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत :-

चीनला जाणाऱ्या प्रवाशांनी या सूचनांचे पालन करावे-

  • साबणाने वारंवार हात धुवावेत
  • खोकताना वा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा
  • सर्दी, खोकला झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात जाणे टाळावे
  • कमी शिजलेले मांस खाणे टाळावे
  • सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास मास्कचा वापर करावा

भारतात परत येताना विमानात त्रास जाणवू लागल्यास-

  • विमानातल्या कर्मचाऱ्यांना त्याविषयी माहिती द्या
  • विमान कर्मचाऱ्यांकडून मास्क मागून घ्या
  • सहप्रवाशांशी थेट संपर्क टाळा

चीनहून परतल्यानंतर एक महिन्याच्या आत आजारी पडल्यास –

  • जवळच्या आरोग्य केंद्राला त्याची माहिती द्या त्याचबरोबर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही तुमच्या प्रवासाबद्दल माहिती पुरवा

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 


(Release ID: 1599718) Visitor Counter : 144


Read this release in: English