संरक्षण मंत्रालय
भारत आणि फिनलंड यांच्यात द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वृद्धींगत करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
Posted On:
15 JAN 2020 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2020
भारत आणि फिनलंड यांच्यातले संरक्षण सहकार्य अधिक वृद्धींगत करणाऱ्या सामंजस्य करारावर संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि फिनलंडच्या संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव जुक्का जुस्ती यांनी आज नवी दिल्ली स्वाक्षऱ्या केल्या. रायसिना संवाद 2020 च्या दरम्यान संरक्षण उपकरणांबाबत संशोधन आणि विकास, उत्पादन, खरेदी तसेच औद्योगिक सहकार्याबाबतच्या या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या सामंजस्य कराराच्या व्यापक कक्षेअंतर्गत फिनलंडच्या कंपन्या आणि भारतीय संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम यांच्यातल्या सहयोगाच्या शक्यता पडताळण्यात येणार आहेत.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1599478)
Visitor Counter : 204