पंतप्रधान कार्यालय

ओमानचे सुलतान काबूस बीन सईद अल सईद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

Posted On: 11 JAN 2020 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहिम सुलतान बीन सईद अल सईद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या संदेशात ते म्हणतात महामानव सुलतान बिन सईद यांचे निधन झाल्याबद्दल मला अत्यंत दुःख झाले आहे. ते एक दूरदर्शी नेते आणि राजकारणी होते ज्यांनी ओमानला आधुनिक आणि समृद्ध राष्ट्रात रूपांतरित केले. आमच्या देशासाठी आणि जगासाठी ते एक शांतीचा प्रकाश दूत होते.

सुलतान बीन सईद हे भारताचे खरे मित्र होते.  भारत आणि ओमान यांच्यात धोरणात्मक सामरिक भागीदारी विकसित करण्यासाठी त्यांनी मजबूत नेतृत्व प्रदान केले. त्यांच्याकडून मला मिळालेल्या प्रेमळपणा आणि आपुलकीची मी नेहमीच कदर करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना असे पंतप्रधान म्हणाले.

 

I am deeply saddened to learn about the passing away of His Majesty Sultan Qaboos bin Said al Said. He was a visionary leader and statesman who transformed Oman into a modern and prosperous nation. He was a beacon of peace for our region and the world. pic.twitter.com/7QnGhM5lNA

— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2020

 

 

B.Gokhale/D.Rane

 

 



(Release ID: 1599151) Visitor Counter : 84


Read this release in: English