रेल्वे मंत्रालय
2021-22 पर्यंत रेल्वे 1000 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करणार
Posted On:
09 JAN 2020 5:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2020
2021-22 पर्यंत रेल्वे 1000 मेगावॅट सौरऊर्जा आणि 200 मेगावॅट पवनऊर्जा निर्मिती करणार आहे. यापैकी 500 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प रेल्वे इमारतीच्या छतावर उभारले जातील आणि त्यांचा वापर नॉन ट्रॅक्शन भार उचलण्यासाठी केला जाईल तर 500 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प जमिनीवर उभारले जातील आणि त्यांचा वापर ट्रॅक्शन आणि बिगर ट्रॅक्शन गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाईल. दक्षिण मध्य रेल्वे सक्रियपणे ऊर्जा संवर्धन करत असून त्यांनी रेल्वे स्थानकं, इमारती आणि रेल्वे फाटकांवर सौर पॅनल बसवले आहेत. नंदीयाल-येरागुंटला हा मार्ग दक्षिण मध्य रेल्वेवरील पहिला सौर मार्ग आहे.
देशभरातील 16 स्थानकं हरीत रेल्वे स्थानकं म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मध्य रेल्वेवरील रोहा, पेण, आपटा यांचा यात समावेश आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1598947)
Visitor Counter : 162