मंत्रिमंडळ

भारत आणि स्वीडनमधील ध्रुवविज्ञानात सहकार्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता

Posted On: 08 JAN 2020 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला, पृथ्वी विज्ञान मंत्रालय (एमओईएस), भारत आणि शिक्षण आणि संशोधन मंत्रालय, स्वीडन यांच्यात झालेल्या ध्रुवीय विज्ञानातील सहकार्याबाबतच्या कराराची माहिती दिली गेली. 2 डिसेंबर 2019 रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

भारत आणि स्वीडन या दोन्ही देशांनी अंटार्क्टिक तह आणि पर्यावरण संरक्षणाविषयी अंटार्क्टिक करारावर स्वाक्षरी केली आहे. आठ आर्कटिक देशांपैकी एक असलेला स्वीडन हा आर्कटिक परिषदेचा सदस्य आहे तर आर्कटिक परिषदेमध्ये भारताला निरीक्षकाचा दर्जा मिळाला आहे. आर्कटिक आणि अंटार्क्टिक या दोन्ही ध्रुवीय विभागांमध्ये स्वीडन अनेक वैज्ञानिक कार्यक्रम राबवित आहे. त्याचप्रमाणे, भारत महासागर क्षेत्रासह दोन्ही ध्रुव प्रदेशांमध्ये वैज्ञानिक संशोधन कार्यक्रम राबवत आहे.

भारत आणि स्वीडन यांच्यातील  ध्रुवियविज्ञानामधील हे सहकार्य दोन्ही देशांना परस्पर उपलब्ध असलेल्या कौशल्याचे आदानप्रदान करण्यास मदत करेल.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 



(Release ID: 1598777) Visitor Counter : 203


Read this release in: English