माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पहिले आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान प्रदान

प्रविष्टि तिथि: 07 JAN 2020 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2020

 

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पहिले आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान 30 माध्यम संस्थांना आज नवी दिल्लीत प्रदान केले.

समाजाच्या कल्याणासाठी योगप्रसार करण्यात योगदान देणाऱ्या मिडिया संस्थांचा हा आगळा सन्मान आहे, असे जावडेकर यावेळी म्हणाले. लोकमान्य टिळकांचे स्मरण करत, स्वराज्याप्रती जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या ‘केसरी’ वर्तमानपत्राचा उल्लेख त्यांनी केला. आज माध्यम संस्था ‘सुराज’ प्रती जनजागृती करत आहेत, असे सुराज जिथे उत्तम आरोग्यसेवा, शिक्षण आणि नागरी सुविधा सर्वांसाठी उपलब्ध आहेत. भारताच्या प्रगल्भ लोकशाहीची ही खूण असल्याचे जावडेकर म्हणाले.

योग ही आरोग्यासाठीची प्रतिबंधात्मक शैली आहे. योग ही भारताची ओळख असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

रेडिओ, दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यम अशा तीन श्रेणीत हे पुरस्कार देण्यात आले.

 

 

M.Chopade/N.Chitale/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1598648) आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English