वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंग यांचे 2035 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत 1 ट्रिलियन डॉलर्सचे योगदान राहील – पियुष गोयल
वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांच्या हस्ते एनएसई नॉलेज हबचे नवी दिल्लीत उद्घाटन
Posted On:
06 JAN 2020 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2020
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल स्ट्रॉक एक्सेंज नॉलेज हबचे उद्घाटन केले. जगात दुसरे मोठे फिनटेक हब म्हणून भारत विकसित झाला असला तरी बीएफएसआय अर्थात बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात अद्याप बरेच काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उद्योगानुसार असलेल्या या शिक्षण प्रणालीमुळे बीएफएसआय क्षेत्रात भारताला अद्ययावत कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंगमुळे 2035 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक ट्रिलियन डॉलर्सचे योगदान राहील, असे गोयल म्हणाले. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन बीएफएसआय क्षेत्रात मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्याचा साधन म्हणून वापर करण्याचा एनएसईच्या प्रयत्नाची त्यांनी प्रशंसा केली.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1598539)
Visitor Counter : 146