विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

14 वैज्ञानिकांना 2018-19 वर्षासाठी स्वर्ण जयंती फेलोशिप देण्यात आली

Posted On: 02 JAN 2020 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2020

 

नाविन्यपूर्ण संशोधन कल्पना असलेल्या प्रकल्पांमध्ये सहभाग आणि संबंधित शाखांमधील संशोधन आणि विकास कार्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता असलेल्या 14 वैज्ञानिकांना 2018-19 वर्षासाठी स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती देण्यात आली. तीन-स्तरीय प्रक्रियेच्या माध्यमातून या पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या वैज्ञानिकांना मुक्तपणे अनोखे संशोधन करता येईल.

देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती योजना सुरु केली होती. या योजने अंतर्गत निवडक युवा वैज्ञानिकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मूलभूत संशोधनासाठी विशेष सहाय्य पुरवले जाते.

पाठ्यवृत्ती आणि संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या वैज्ञानिकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून मदत केली जाते. संशोधनासाठी दरमहा 25 हजार रुपये पाठ्यवृत्तीचा यात समावेश आहे. तसेच वैज्ञानिकांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये संशोधन अनुदान देखील दिले जाते. 443 अर्जदारांपैकी 14 वैज्ञानिकांची या पाठ्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.

पुरस्कार विजेत्यांचा थोड्यात परिचय

 

 

M.Chopade/S.Kane/D.Rane



(Release ID: 1598262) Visitor Counter : 219


Read this release in: English