रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेकडून प्रवासी भाड्याचे सुसूत्रीकरण


प्रवाशांना अद्ययावत सुविधा आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी उपाययोजना

Posted On: 01 JAN 2020 5:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2020

 

रेल्वेगाड्या आणि स्थानकांचे आधुनिकीकरण आणि सुधारित सुविधा पुरवण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सातत्याने केला जात आहे. 2014-15 मध्ये शेवटची भाडेदरवाढ करण्यात आली होती. प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी प्रवाशांवर वाढीव भाड्याचा बोजा न टाकता अल्पशी भाडेवाढ आवश्यक आहे. तसेच रेल्वेसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे प्रवासी भाड्याचे सुसूत्रीकरण करणे आवश्यक बनले आहे. यामुळे रेल्वेचे वेगाने आधुनिकीकरण करण्यास मदत मिळेल.

उपनगरीय रेल्वे प्रवासी आणि पासधारक प्रवाशांना दिलासा देत रेल्वेने प्रवासी भाड्यात कुठलीही दरवाढ केली नाही. साधारण विना-वातानुकूलित श्रेणीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकिटाच्या दरात प्रति किलोमीटर एक पैशाने वाढ केली आहे. 1 जानेवारी 2020 पासून ही दरवाढ लागू होणार असून, त्यापूर्वी तिकिटांचे आरक्षण केलेल्यांना वाढीव शुल्क आकारले जाणार नाही.

 

प्रवासी भाड्यातील सुधारणा पुढीलप्रमाणे:-

  1. साधारण विना-वातानुकूलित श्रेणी (बिगर-उपनगरीय):- भाडेवाढ 1 पैसे / प्रवासी किलोमीटर
  2. मेल/एक्स्प्रेस विना-वातानुकूलित श्रेणी:- भाडेवाढ 2 पैसे / प्रवासी किलोमीटर
  3. वातानुकूलित श्रेणी:- भाडेवाढ 4 पैसे / प्रवासी किलोमीटर
  4. उपनगरीय भाडे आणि पास:- वाढ नाही.

 

राजधानी, शताब्दी, दुरोंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, महामना, गरीब रथ, जन शताब्दी सारख्या गाड्यांच्या सध्याच्या भाड्यात वरील प्रस्तावित दरानुसार वाढ केली जाईल. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट सरचार्ज सारख्या शुल्कात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1598189) Visitor Counter : 129


Read this release in: English