पंतप्रधान कार्यालय

देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल जनरल बिपीन रावत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 01 JAN 2020 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2020

 

देशाच पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्याद्दल जनरल बिपिन रावत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘आपण नवीन वर्ष आणि नवीन दशकाची सुरुवात करत असताना, भारताला जनरल बिपीन रावत यांच्या रुपाने पहिले संरक्षण दल प्रमुख लाभले आहेत. या जबाबदारीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी अतिशय उत्साहाने आणि जोशाने देशाची सेवा केली आहे.

संरक्षण दलाचे पहिले प्रमुख आज पदभार स्वीकारत असताना, मी देशाची सेवा करणाऱ्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो. कारगिल युद्ध लढलेल्या शूर जवानांचे मी स्मरण करतो. या युद्धानंतरच आपल्या सैन्यदलात सुधारणा करण्याबाबत चर्चा सुरु झाली आणि आजच्या ऐतिहासिक घडामोडीपर्यंत गेली.

15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन मी भारताला संरक्ष्ण दलाचे प्रमुख लाभतील अशी घोषणा केली होती. आपल्या सैन्य दलाचे आधुनिकीकरण करण्याची मोठी जबाबदारी संरक्षण दल प्रमुखांवर आहे. 1.3 अब्ज भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा ते प्रतिबिंबित करतात.

आवश्यक लष्करी अनुभवासह लष्करी कामकाज विभागाची निर्मिती तसेच संरक्षण दल प्रमुख पदाची निर्मिती हा ऐतिहासिक क्षण आहे. या व्यापक सुधारणांमुळे देशाला आधुनिक युद्धाच्या बदलत्या आव्हानांना सामोरे जायला मदत होईल.’

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane



(Release ID: 1598165) Visitor Counter : 157


Read this release in: English