रेल्वे मंत्रालय
अहमदाबाद-मुंबई मार्गावर भारतीय रेल्वे करणार तेजस एक्सप्रेसचा प्रारंभ
Posted On:
30 DEC 2019 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2019
लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेसच्या यशानंतर अहमदाबाद-मुंबई दरम्यान दुसरी तेजस एक्सप्रेस धावण्यासाठी सज्ज आहे. रेल्वे प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येत आहे. या दुसऱ्या तेजस रेल्वेगाडीला 17 जानेवारी 2020 रोजी हिरवा झेंडा दाखवला जाणार असून, 19 जानेवारी 2020 पासून या गाडीची नियमित सेवा सुरु होईल.
ही गाडी संपूर्ण वातानुकूलित असून, या गाडीत दोन एक्सिक्युटिव क्लास चेअर कार आणि आठ चेअर कार असतील. एकूण 736 प्रवासी वाहून नेण्याची या गाडीची क्षमता आहे. ही गाडी नाडियाद, वडोदरा, भरुच, सुरत, वापी आणि बोरीवली या स्थानकांवर थांबेल. गुरुवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही गाडी धावणार आहे.
S.Tupe/J.Patankar/D.Rane
(Release ID: 1598015)
Visitor Counter : 131