नागरी उड्डाण मंत्रालय

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सेवांना प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 30 DEC 2019 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2019

 

केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अर्थात डीजीसीएच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सेवांचा प्रारंभ झाला आहे. महासंचालनालयाच्या नवीन वेब-साईटवर या सेवांचा प्रारंभ करण्यात आला.

या सेवांच्या शुभारंभामुळे व्यावसायिक वैमानिक परवाना तसेच इतर परवाना पत्र देणे आता स्वयंचलित झाले आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या अर्जांच्या छाननीनंतर परवाना पत्र देण्यात येतील. डीजीसीएच्या इतर सेवाही टप्प्याटप्प्यानं स्वयंचलित करण्यात येणार आहेत.

 

 

 

S.Tupe/J.Patankar/D.Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1597990) आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English