गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत 1 कोटी घरांना मंजुरी, बांधकाम आणि संलग्न क्षेत्रांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी- हरदीप सिंग पुरी
Posted On:
27 DEC 2019 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2019
देशातील शहरी भागात 1.12 कोटी घरांची मागणी आहे त्यापैकी 1 कोटी घरांच्या बांधकामासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. त्याशिवाय 57 लाख घरांचे बांधकाम सुरु असून त्यापैकी सुमारे 30 लाख घरं जवळपास पूर्ण होत आली आहेत असेही त्यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेच्या तुलनेत प्रधानमंत्री आवास योजनेने गेल्या साडे चार वर्षात जवळपास दसपट उदिृष्ट साध्य केली आहेत अशी माहिती त्यांनी आज नवी दिल्लीत दिली. प्रधानमंत्री आवास योजना ही जगातली सर्वात मोठी सर्वात मोठी स्वस्त घरांची योजना आहे.
या योजनेअंतर्गत सुमारे 5.8 लाख ज्येष्ठ नागरिक, 2 लाख बांधकाम मजूर, दीड लाख घरकामगार, दीड लाख कारागीर, 63 लाख दिव्यांग, 770 तृतीय पंथी आणि 500 कुष्ठ रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत स्त्री सक्षमीकरण साध्य करण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रत्येक घर घरातल्या स्त्री च्या किंवा दोघांच्या नावावर केले जात आहे.
या योजनेमुळे गृहनिर्माण क्षेत्रात मोठी गुंतवणूक आली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या घरांसाठी 5.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सध्या तीन लाख कोटी रुपयांची काम सुरु असून ज्यावेळी संपूर्ण घरांचे लक्ष्य पूर्ण होईल त्यावेळी या योजनेअंतर्गत 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असेल असे पुरी यांनी सांगितले.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1597825)
Visitor Counter : 140