इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

देशातल्या 125 कोटी रहिवाशांकडे आधार क्रमांक

प्रविष्टि तिथि: 27 DEC 2019 3:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2019

 

देशातल्या आधार क्रमांक धारकांची संख्या 125 कोटींच्या पुढे गेली आहे, अशी माहिती भारतीय एकल ओळख प्राधिकरण-युआयडीएआयने दिली आहे. वर्ष 2019 संपता संपता देशातल्या 125 कोटी नागरिकांना आधार क्रमांक मिळाला आहे.

आधार कार्डधारकांकडून प्राथमिक ओळखपत्र म्हणून आधारचा वापर करण्याचे प्रमाणही वाढते आहे. आधार-आधारित ओळखपत्र सेवा आतापर्यंत 37,000 कोटी वेळा वापरली गेली असल्याचे दिसत असून, आधारचा ओळखपत्र म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.

युआयडीएआयने आतापर्यंत 331 कोटी आधार तपशीलांचे अद्ययावतीकरण केले आहे.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 


(रिलीज़ आईडी: 1597799) आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English