महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन
अर्ज भरण्याची अंतीम तारीख 7 जानेवारी
Posted On:
26 DEC 2019 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2019
महिला आणि बालविकास मंत्रालयाने 2019 या वर्षाच्या नारी शक्ती पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. महिला सक्षमीकरण आणि विशेषत: दुबळ्या आणि डावललेल्या महिलांसाठी कार्यरत संस्था, गट आणि व्यक्तींना हे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. येत्या आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 40 व्यक्ती/संस्थांना हे पुरस्कार देण्यात येतील.
या पुरस्कारांबाबतची अधिक माहिती www.narishaktipuraskar.wcd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुरस्कारासाठीचे अर्ज या संकेतस्थळावरच भरायचे असून त्याची अंतीम तारीख 7 जानेवारी 2020 आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय ही महिला कल्याण कार्यात महत्वाची भूमिका निभावते.
G.Chippalkatti/P.Malandkar
(Release ID: 1597705)
Visitor Counter : 124