आयुष मंत्रालय

वर्ष समाप्ती पुनरावलोकन 2019- आयुष मंत्रालय


1032 आयुष आरोग्य आणि निरामयता केंद्रांसाठी रूपये 89.92 कोटींची तरतूद

91 एकात्मिक आयुष रुग्णालये स्थापन केली जात आहेत - आर्थिक सहाय्य पुरवले आहे

निती आयोग आणि इन्वेस्ट इंडियाच्या सहकार्याने एकात्मिक आरोग्य संशोधन आणि योजना (सिहर) तयार केली गेली

केंद्रीय कौन्सिलने 2019 दरम्यान 140 शास्त्रीय औषधे 70 व्याधींसाठी प्रमाणित केली

Posted On: 23 DEC 2019 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2019

 

आयुष आरोग्य व्यवस्थेची पाळेमुळे आपली संस्कृती, परंपरा आणि वेगवेगळ्या प्रांतांतील सामान्य माणसांमध्ये खोलवर रुजलेली असल्या कारणामुळे ती सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण स्रोत आहे. त्यांची प्रासंगिकता, जीवनशैलीशी संबंधित जुनाट आजारांच्या व्यवस्थापनात आणि विशेषत़: वृद्ध नागरिकांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या देशातील वाढत्या आरोग्य चिंता आहेत.

आपल्या स्थापनेच्या पाचव्या वर्षात आयुष मंत्रालयाने वैकल्पिक औषधांच्या लोकप्रियतेच्या दिशेने मिळवलेले यश बळकट करण्याकरिता मजबूत आणि सर्वसमावेशक रचना तयार करण्याची मोहीम राबवली. सन 2019 च्या दरम्यान आयुष प्रणालीला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मंत्रालयाने प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यात लक्षणीय यश संपादन केले. या प्रयत्नांमध्ये आयुष आरोग्यकेंद्रांमधील प्रवेश सुधारणे, आयुष संशोधन, आयुष शिक्षण, आयुष औषधे आणि संबंधित बाबी, जागरूकता निर्माण करणे, आयुष प्रणाल्यांच्या जागतिकीकरणासाठी प्रयत्न, आयुष्य क्षेत्रांमध्ये आयटीचा समावेश या प्रमुख सात उपक्रमांचा समावेश आहे.

आयुष आरोग्य सेवा सुकर करणे

राष्ट्रीय आयुष मिशन ही केंद्र पुरस्कृत योजना (एनएएम) आयुष आरोग्य सेवेत  प्रवेशास प्रोत्साहन देण्याचे मुख्य साधन आहे. आयुष क्षेत्राच्या विकासासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या प्रयत्नांना ही योजना मदत करते. आयुष्मान भारत योजनेची 10 टक्के आरोग्य व कल्याण केंद्रे (एचडब्ल्यूसी) राज्य/ केंद्रशासित प्रदेश सरकारच्या माध्यमातून आयुष मंत्रालया मार्फत कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मंत्रालयाने आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्र यांमध्ये सुधारणा करण्याकरता एनएएमच्या विद्यमान केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 1032 आयुष दवाखान्याकरिता 89.9 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. पंतप्रधानांनी 30 ऑगस्ट 2019 रोजी हरियाणा राज्यात दहा आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्र डिजिटल मोडच्या माध्यमातून सुरू केली. ही 1032 आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्र देशातील दूरदूरच्या भागातही आयुष आरोग्यसेवा  लोकांमध्ये पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतील.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय) अंतर्गत आयुष विमा पॅकेजेसच्या समावेशासाठी आयुर्वेद, सिद्ध, युनानी, योग आणि निसर्गोपचार पॅकेजेसचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) कडे पाठविला गेला आहे. आयुष आरोग्य सेवा मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी), सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि जिल्हा रुग्णालये (डीएचएस) यांच्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सुविधा सह-स्थान तसेच एनएएम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत राबविण्यात येत आहेत. 30 जून 2019 पर्यंत आयुष घटकाच्या मुख्य प्रवाहात, आयुष सुविधेसह 7620 पीएचसी, 2758 सीएचसी आणि 495 डीएचसह सह-कार्यरत आहेत, ज्यायोगे आयुष उपचार देशातील विविध भागात लोकांसाठी उपलब्ध आहेत.

आयुष मार्फत माध्यमिक/तृतीयक आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालय देशात 50 खाटांचे एकात्मिक आयुष रुग्णालये उभारण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे. चालू वर्षात मंत्रालयाने अशा  50 खाटांपर्यंतच्या 91, एकात्मिक आयुष रुग्णालये उभारण्याकरिता  अशा 6 रुग्णालयांना आर्थिक सहाय्य केले आहे. आयुष मंत्रालयाने जंगलावरील दबाव कमी करण्याकरिता आणि एएसयु व एच उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीत वनौषधींच्या लागवडीकरिता 48050 हेक्‍टर क्षेत्रास मदत केली आहे. या उद्देशाने 1544 क्लस्टर अंतर्गत 56711 शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाने दर्जेदार रोप लागवड सामग्रीच्या वितरणासाठी देशभरातील 190 रोपवाटिकांना मदत दिली आहे.

सोवा-रिग्पाची परंपरा पुनरुज्जीवित करणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे याकरिता लेह येथे सोवा-रिग्पा या राष्ट्रीय संस्थेच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. सोवा-रिग्पा ही भारतातील हिमालयन पट्टयाची पारंपारिक वैद्यकीय प्रणाली आहे. याचा वापर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, दार्जीलिंग (पश्चिम बंगाल), हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश लडाख येथे अतिशय लोकप्रिय आहे. सोवा-रिग्पाच्या राष्ट्रीय संस्थेच्या स्थापनेमुळे संपूर्ण भारतीय उपखंडात सोवा-रिग्पाच्य़ा पुनरुज्जीवनाला चालना मिळेल.

मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा (एमडीएनआयवाय), आयुष मंत्रालय, जेल मुख्यालय, मध्यवर्ती कारागृह, तिहार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2019 चे आयोजन तिहार तुरुंगात करण्यात आले. यात 16000 हून अधिक कैद्यांनी कॉमन योगा प्रोटोकॉलवर आधारित योग प्रशिक्षण घेतले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (एनआयएन), पुणे यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने निसर्गोपचार आणि महात्माजींना प्रिय असणाऱ्या उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचवून उत्सव साजरा केला. एनआयएनने "निसर्गोपचार महोत्सव" या कार्यक्रमांतर्गत 150 निसर्गोपचार शिबिरांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. ही योजना 2 ऑक्टोबर 2019 पासून वर्षभर संपूर्ण भारतभर राबविली जाईल. या शिबिरापैकी पहिले शिबिर गोवा येथे 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान घेण्यात आले, ज्यामध्ये जवळपास 5000 लोकांनी निसर्गोपचाराचा फायदा मिळविला.

आयुष प्रणालींमध्ये संशोधन उपक्रमास प्रोत्साहन देणे

मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांना समर्पित केंद्रीय संशोधन समिती आयुष संशोधनाचा मुख्य आधार राहिली. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि सिद्ध यांच्या केंद्रीय संशोधन परिषदांनी क्लिनिकल सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे पुरावे तयार करून या काळात 70 व्यांधीसाठी 140 शास्त्रीय औषधांना वैधता दिली. भविष्यासाठी मोठ्या संभाव्य परिणामाच्या विकासामध्ये, निती आयोग आणि इन्व्हेस्ट इंडिया (एजीएनआय प्लॅटफॉर्म) च्या सहकार्याने एकात्मिक आरोग्य संशोधन योजना (एसआयएचआर) तयार केली गेली आहे. ही आयुष प्रणाल्यांच्या अखंडित संभाव्यतेचा आणि पुरावा आधारित समाकलित पद्धतींच्या माध्यमातून आधुनिक औषधासह सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना संबोधित करेल. जागतिक स्तरावर ठसा उमटवणार्‍या या उपक्रमासाठी पुढील दोन वर्षांत 490 कोटीं रुपयांची तरतूद केली आहे. सार्वजनिक आरोग्यामध्ये प्रजनन आणि बाल आरोग्य (आरसीएच) विभागामध्ये आयुर्वेद सुरू करण्यासाठी उच्च प्रभाव संशोधन प्रकल्प महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यान्वित झाला. यामध्ये 10,000 गर्भवती महिलांचा अभ्यास केला जाईल. वैद्यकीय संशोधन प्रकल्पासाठी ही एक मोठी नमूना संख्या आहे.

या वर्षात, आयुष मंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी हैद्राबादच्या येरागड्डा येथे केंद्रीय संशोधन संस्थेच्या युनानी औषधाच्या त्वचेच्या जुनाट विकारांसाठी युनानी मेडिसिनच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. नवी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिट आणि युनानी मेडिकल सेंटरचे उद्‌घाटनही  इंटिग्रेटेड मेडिकल रिसर्चसाठी करण्यात आले. दिल्ली कॅन्टोनमेंट, नवी दिल्ली येथील रुग्णालयातील उपशासकीय सुश्रुषा केंद्रातील आयुर्वेद पॅलेटिव्ह केअर युनिट या वर्षी सुरू करण्यात आलेली आणखी एक आशादायक संस्था आहे. महत्वपूर्ण संशोधन कार्यात, होमिओपॅथीच्या केंद्रीय संशोधन मंडळाने गोरखपूरमधील विशिष्ट भागात आढळणारा ब्रेन फिव्हर (एन्सेफलायटीस) आणि डेंग्यू हेमोरॅजिक फिव्हर विषयावरील अभ्यासांवर 2019 मध्ये यशस्वी प्रकल्प केले आहेत.

आयुष शिक्षण:

2019 मध्ये आयुष शिक्षण क्षेत्राला विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गाकडे नेण्यात मंत्रालयाला यश आले. सर्व आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (एनईईटी) ची व्यापक अंमलबजावणी ही एक उपलब्धी होती. देशातील आयुष शिक्षणाच्या गुणवत्तेवर  याचा दीर्घकाळ प्रभाव पडेल.

आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी पोस्ट ग्रॅज्युएट संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट (एआयपीजीईटी) सुरळीत पार पडली. याचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केले होते. केंद्र सरकारतर्फे 2019 मध्ये प्रथमच युजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या 15 टक्के अखिल भारतीय कोट्यासाठी नोंदणी, वाटप आणि अहवाल देण्यासह ऑनलाईन समुपदेशन घेण्यात आले होते ज्यायोगे शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी महाविद्यालये तसेच अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे व राष्ट्रीय संस्थांमधील विद्यार्थी-अर्जदारांना याचा फायदा झाला.

आयुष शैक्षणिक संस्थांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली होती, त्या कारणास्तव ही वार्षिक प्रक्रिया मागील वर्षांच्या तुलनेत खूप आधी पूर्ण झाली. आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या 10 राष्ट्रीय संस्थाना विशेष महत्त्व आहे कारण त्या त्यांच्या संबंधित विषयांत शिक्षणासाठी निकष निश्चित करतात. या राष्ट्रीय संस्थांचे अत्यंत उत्पादनक्षम वर्ष होते आणि त्यांनी काही महत्त्वपूर्ण कामगिरी करुन  दाखविली आहे.

जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे (एनआयए) उन्नतकरण सुरू आहे आणि एनआयएच्या जयपूरच्या दुसऱ्या  संकुलासाठी 1.37 एकर जागेच्या खरेदीस अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. त्यासोबतच अभिमत विद्यापीठाचा दर्जा  देण्याबाबत  अर्ज संस्थेने युजीसीला सादर केला आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सिद्ध (एनआयएस), चेन्नईने वर्ममच्या प्राचीन प्रथेला प्रोत्साहन आणि पुनरुज्जीवन देण्यासाठी काही पावले उचलली आहेत. सिद्ध प्रणालीत वर्मम सायन्सच्या इतिहासा विषयी आणि औषधोपचाराचे मूल्य शोधून काढण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय परिषदेला जनतेचा व डॉक्टरांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. वर्मम अनेक न्यूरोलॉजिकल, डिजनरेटिव्ह आणि ऑर्थोपेडिक व्याधींसाठी प्रभावी असल्याचे दिसून येते. एनआयएसने वर्मम अभ्यासावरील सर्वसमावेशक माहिती असलेले ‘वर्मम विज्ञानाची अभ्यास पत्रिका’ हे पुस्तक देखील संकलित केले. संस्थेने वर्ममसाठी खास ओपीडी देखील सुरू केली आहे. सन 2019 मध्ये, आरोग्य सेवा आणि चिकनगुनिया, सोरायसिस इत्यादी आजारांवरील 10 महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थांद्वारे सुरू केले गेले.

आयुष औषध धोरण आणि संबंधित बाबीः

आयुष औषधीचे नियमन व नियंत्रण, आयुष औषधांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे आणि वर्षभर हे केंद्रस्थानी राहिले. 2019 मधील आयुष औषध धोरण आणि त्यासंबंधित बाबींमधील महत्त्वपूर्ण कामगिरी - आयुष औषध नियंत्रणासाठी    एक यंत्रणा अधिसूचित 9 नियामक पदांसह औपचारिक करण्यात आली. ही आयुष औषध उद्योगाची परिपक्वता दर्शवते. पारंपारिक आणि पूरक औषधांसाठी विशेष औषध नियमन असलेल्या काही देशांपैकी भारत एक झाला आहे; ऑनलाईन परवाना अर्जासाठी ई-औषधी पोर्टलला  राज्य परवाना मंडळाला समाविष्ट करून बळकटी दिली गेली. जन औषधी योजनेत आयुष औषधींचा समावेश करण्यात आला. आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथीची आवश्यक औषधांची यादी अद्ययावत करुन सुधारित केली.

वर्षभरात आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी औषधांच्या सुरक्षिततेवर नजर ठेवण्यासाठी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर पाळत ठेवण्यासाठी एएसयू आणि एच औषधांसाठी फार्मा-कोविजिलन्सची केंद्रीय क्षेत्र योजना वर्षभरात सक्षम करण्यात आली. नॅशनल फार्मा-कोविजिलन्स को-ऑर्डिनेशन सेंटर (एनपीव्हीसीसी), पाच इंटरमेडियरी फार्मा-कोविजिलेन्स सेंटर (आयपीव्हीसी) आणि पेरिफेरल फार्मा-कोविजिलेन्स सेंटर (पीपीव्हीसी) असलेले तीन स्तरीय नेटवर्क स्थापित करण्यासाठी अनुदान-सहाय्य मंजूर करण्यात आले. पाच मध्यस्थ आणि एक राष्ट्रीय केंद्रांतर्गत 63 पीपीव्हीसी स्थापन करण्यात आल्या आहेत. जानेवारी 2019 पासून एएसयू आणि एच औषधांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रतिकूल घटनांची नोंद सुरू झाली. ऑक्टोबर 2019 मध्ये एएसयू आणि एच औषधांच्या प्रतिकूल प्रभावाच्या जवळपास 250 घटना नोंदविल्या गेल्या.

आयुष मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था गाझियाबाद येथील फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अ‍ॅण्ड होमिओपॅथी (पीसीआयएम Hन्ड एच), आयुष फार्माकोपियास परिष्कृत करण्यासाठी प्रयत्न करत राहिले. फार्माकोपियास विशेष महत्त्व आहे कारण ते आयात केलेल्या, विक्रीसाठी तयार केलेल्या, साठवलेल्या किंवा विक्रीसाठी प्रदर्शित किंवा भारतात वितरित केलेल्या औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांचे अधिकृत संयोजन आहेत. 2019 दरम्यान पीसीआयएम अँड एचने खालील फार्माकोपिया प्रकाशने प्रसिद्ध केली:

युनानी : 11 फेब्रुवारी 2019 रोजी युनानी दिनी 50 युनानी फॉर्म्युलेशनची मोनोग्राफ्स असलेली यूपीआय, भाग -२, खंड 4 प्रसिद्ध केला.

होमिओपॅथी : होमिओपॅथी दिवसानिमित्त होमिओपॅथिक फार्मास्युटिकल कोडेक्स (ई-कॉपी) (45 औषधे) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आयुर्विज्ञान मंत्रालयाची फार्माकोपीयल लेबोरेटरी (पीएलआयएम) हे आयुष मंत्रालयाचे आणखी एक अधीनस्थ कार्यालय आहे. ते आयुष प्रॅक्टिसमध्ये अत्याधुनिक पातळीला बळकटी आणि जोडण्यासाठी कार्यरत आहे. सन 2019 मध्ये या प्रयोगशाळेतील प्रमुख कामगिरी अशीः

2019-20 मध्ये औषध अंमलबजावणी अधिकारी / औषध निरीक्षक आणि गुणवत्ता नियंत्रण कर्मचारी यांच्या संदर्भात 4 (चार) प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला.

40 सुगंधितद्रव्य यांचे विश्लेषण 2019-20 मध्ये एपीसीकडे सादर केले.

2019-20 मध्ये औषधी वनस्पतीसाठी 2 (दोन) सर्वेक्षण दौरे पूर्ण केले.

ऑगस्ट 2019 मध्ये वसई (मुंबई) येथे राष्ट्रीय (1) राष्ट्रीय स्तरीय आरोग्य मेळाव्यात भाग घेतला.

बांगलादेशच्या प्रतिनिधींनी ऑगस्ट 2019 मध्ये पीएलआयएमला भेट दिली.

आयुष प्रणाल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे:

आयुष प्रणालीविषयी जनजागृती करणे हा मंत्रालयाचा एक महत्त्वाचा आदेश आहे. 21 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे (आयडीवाय) यशस्वी आयोजन या संदर्भातील सर्वात मोठा टप्पा आहे. मंत्रालयाने शेकडो भागधारक संस्था ओळखण्याचे धोरण अवलंबून आयडीवायला मोठ्या प्रमाणात चळवळीत रूपांतरित केले. आणि त्यांच्याशी सहयोग करीत आहे. 5 वा आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2019 पूर्वीच्यापेक्षा अधिक व्याप्ती आणि विशालतेत साजरा झाला. हे उत्सव केवळ भारतातील सर्व राज्ये आणि जिल्ह्यातच नव्हे, तर   विदेशातील 150 देशांमध्ये साजरे करण्यात आले. मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम झारखंडच्या रांची शहरात आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधानांनी जवळजवळ 30 हजार  योग साधकांसह योगासने केली. सिडनीमधील ऑपेरा हाऊस, पॅरिसमधील आयफेल टॉवर, वॉशिंग्टनमधील वॉशिंग्टन स्मारक, ब्राझीलियामधील कॅथेड्रल ऑफ ब्राझिलिया, चीनमधील साओलिन टेंपल, डेड सी आणि नेपाळ मधील माउंट एव्हरेस्टचा तळ यासह जगभरात योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मंत्रालय आणि स्वायत्त संस्थांकडून आयुष आरोग्यसेवेच्या प्रतिबंधक आणि प्रोत्साहन देणाऱ्या पैलूंवर देशातील विविध भागात सुमारे 100 चर्चासत्रे आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या व्यतिरिक्त मंत्रालयाच्या आयुष संस्थांकडून जवळपास 50 रुग्णांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आयुष संकल्पनेवर दहा प्रमुख प्रदर्शनेही भरवण्यात आली.

आयुष मंत्रालयाने अमर चित्र कथा, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोफेसर आयुष्मान: औषधी वनस्पती व त्यांची औषधी मूल्ये’ नावाचे कॉमिक बुक प्रकाशित केले. कॉमिक पुस्तकाचा उद्देश औषधी वनस्पतींविषयी ज्ञान आणि जागरूकता वाढविणे, औषधी वनस्पतींचे विविध प्रकार ओळखणे आणि बागांमध्ये त्यांची लागवड करणे यासह विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे, सामान्यतः उपलब्ध आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींचा वापर लोकप्रिय करणे, संबंधित पारंपारिक ज्ञान भविष्यातील पिढ्यांसाठी मजेदार आणि व्यावहारिक मार्गाने जतन करणे हा आहे.

गुडुची या प्रजाती विशिष्ट मोहिमेच्या अंतर्गत, ‘अमृता फॉर लाइफ’ नावाच्या 11 प्रोजेक्ट्स या  प्रजातीचा प्रसार करण्यास मंजूर करण्यात आल्या, ज्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्याची क्षमता आणि संसर्गाविरूद्ध शरीराचा प्रतिकार आहे.

आयुष प्रणालींचे जागतिकीकरणः

सन 2019 मध्ये आयुष प्रणालींचे जागतिकीकरण करण्याच्या प्रयत्नांना उल्लेखनीय यश मिळाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुष मंत्रालय, संस्था आणि परिषदेच्या सहकार्याने अनेक सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारांमध्ये संशोधन, शिक्षण किंवा आयुष प्रणाल्यांच्या इतर बाबींमध्ये संयुक्त प्रयत्न तीव्र करण्याचे संकेत दिले गेले. ज्या बिम्स्टेक देशांसोबत भारताची उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक समीकरणे आहेत त्यांनी आयुर्वेद आणि पारंपारिक चिकित्सा विद्यापीठ भारत येथे संयुक्तपणे बिम्सटेक विद्यापीठ स्थापित करण्यास सहमती दर्शविली आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीने, एआयआयएने 22 ऑक्टोबर 2019 रोजी पारंपारिक आणि पूरक औषध विषयी मेकॉंग-गंगा कोऑपरेशन (एमजीसी) कार्यशाळेचे आयोजन केले.

दुसऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये, 12 ऑगस्ट 2019 रोजी जगातील दोन सर्वात मोठ्या पारंपारिक औषध प्रशासने असलेल्या भारत आणि चीन यांच्यात सामंजस्य करार करून दोनही देशांच्या लोकांच्या हितासाठी सहयोग केले.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) ने सन 2019 दरम्यान स्वाक्षर्‍या केलेल्या सामंजस्य करारांमध्ये - 18-20 एप्रिल, 2019 रोजी यूके कॉलेज ऑफ मेडिसीन; स्पॉल्डिंग पुनर्वसन रुग्णालय, यूएसए सह सामंजस्य करार, फ्रॅंकफर्ट बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर, फ्रँकफर्ट, जर्मनी 31 ऑक्टोबर, 2019 रोजी आयुर्वेद क्षेत्रात संशोधन सहकार्यासाठी; वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी (डब्ल्यूएसयू), ऑस्ट्रेलिया 21 नोव्हेंबर 2019 रोजी केलेल्या करारांचा समावेश आहे.

आयुष क्षेत्रात आयटीचा समावेश:

वर्षभरात मंत्रालयाने आयुष क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या दृष्टीने भविष्याभिमुख पुढाकार देखील घेतला. आयुष ग्रिड प्रोजेक्ट नाव असलेल्या या प्रकल्पाची या क्षेत्रातील सर्व सिलो व्यापून आयटी बॅकबोन स्थापित करण्याची कल्पना आहे. पंतप्रधानांनी मंत्रालयाच्या आयुष ग्रीड प्रकल्पाचे कौतुक केले आणि आयुष क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची गरज अधोरेखित केली. या क्षेत्रातील परिवर्तनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने या वर्षात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. यामध्ये :-

  1. नव्याने अंमलात आणलेली आयुष-आरोग्य माहिती प्रणाली केंद्रीय संशोधन परिषदेच्या सर्व युनिट्सचा विस्तार करण्यासाठी विस्तृत करण्यात आली आहे.
  2. आयटी प्रकल्पांमध्ये सर्वसमावेशक समर्थनासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाबरोबर सामंजस्य करार झाला आणि त्याअंतर्गत बिसाग अहमदाबाद आणि एनजीडी नवी दिल्ली यांनी मंत्रालयाच्या माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांना पाठिंबा देणे सुरू केले आहे.
  3. मंत्रालयाच्या सर्व कामांचा व्यापकपणे आढावा घेणारा एक मॉनिटरिंग डॅशबोर्ड स्थापित केला गेला आहे.
  4. आयडीवाय 2019 आणि फार्माकोपिया कमिशनला समर्पित पोर्टल.
  5. आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी प्रणालींसाठी प्रमाणित संज्ञेचे अंतिम रूप देण्यात आले असून ते भविष्यकालीन डब्ल्यूएचओच्या रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाच्या (आयसीडी) मध्ये समावेश होण्यास सुलभ बनविते. यामुळे या प्रणाल्यांच्या जागतिकीकरणाचा मार्ग आणखी सुलभ होईल.
  6. योग प्रशिक्षणासाठी जवळपासची ठिकाणे शोधण्यात लोकांना मदत करण्यासाठी योगालोकेटर मोबाईल अँप सुरू केले.

 

G. Chippalkatti /S.Kane/P.Malandkar


(Release ID: 1597646) Visitor Counter : 404


Read this release in: English