मंत्रिमंडळ

केंद्रीय मंत्रिमंडळाने बंगाल पूर्व सीमावर्ती नियमनामध्ये सुधारणा करायला पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी

Posted On: 24 DEC 2019 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बंगाल पूर्व सीमावर्ती  नियम (बीईएफआर),1873 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 372 (2) अन्वये राष्ट्रपतींनी जारी केलेल्या कायदेविषयक बदल (दुरुस्ती) आदेश,2019 ला पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी दिली आहे.

या अधिसूचनेमुळे बीईएफआरच्या सीमा मणिपूर राज्यालाही लागू होतील जेणेकरुन नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 च्या तरतुदींपासून मणिपूरच्या मूळ रहिवाशांना संरक्षण मिळू शकेल. त्यानुसार नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील.

S.Tupe/S.Mhatre/P.Malandkar

 

 


(Release ID: 1597491) अभ्यागत कक्ष : 159
Read this releasein: English