मंत्रिमंडळ
शस्त्रास्त्र (दुरूस्ती) विधेयक, 2019 मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2019 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शस्त्रास्त्र (दुरूस्ती) विधेयक, 2019 मध्ये सुधारणा करण्यासाठी आज अधिकृत मान्यता देण्यात आली. यासंबंधीच्या सुधारणा करण्याचे विधेयक 9 डिसेंबर, 2019 रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले होते.
फायदे: -
या नवीन सुधारणा केल्यामुळे बेकायदेशीर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा त्यांचा व्यापार तसेच बेकायदा शस्त्रास्त्र निर्मिती यांना आळा बसू शकणार आहे. तसेच आजच्या काळात आवश्यक असलेली सुरक्षेची गरज लक्षात घेवून परवानाधारक शस्त्र बाळगणा-यांना शस्त्र परवाना विनासायास मिळणे शक्य होणार आहे.
S.Tupe/S.Bedekar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1597456)
आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English