मंत्रिमंडळ

स्वदेश दर्शन योजनेसाठी 2018-19 या वर्षात मंजूर झालेल्या 10 प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी 627.40 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


2019-20 मधल्या नव्या प्रकल्पांच्या मंजुरीसाठी 1854.67 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीलाही मंजुरी

प्रविष्टि तिथि: 24 DEC 2019 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2019

 

स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत वर्ष 2018-19 मध्ये मंजूर झालेल्या 10 प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी 627.40 कोटी रुपयांच्या निधीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वर्ष 2019-20 मध्ये नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी 1854.67 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला.

‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत पर्यटन मंत्रालय देशातल्या विविध पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा उभारत आहे. भारतात शाश्वत आणि सर्वसमावेशक पर्यटन सुविधा उभारुन देशाला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.

या पायाभूत सुविधांमुळे खाजगी क्षेत्रालाही या सर्व पर्यटन स्थळांवर गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल तसेच पर्यटनास चालना मिळून त्याचा सकारात्मक परिणाम संबंधित प्रदेशांच्या विकासासाठी, महसूल वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी होईल.

पार्श्वभूमी:-

केंद्र सरकारने 2014-15 साली अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर 2015 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत विकासासाठी 15 पर्यटन स्थळे निश्चित करण्यात आली आहेत.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 


(रिलीज़ आईडी: 1597414) आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English