अर्थ मंत्रालय

सीबीआयसीच्या ‘सबका विश्वास’ योजनेची मुंबई शेअर बाजारातल्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी परिसंवादाचे आयोजन


‘सबका विश्वास’ योजना 31 डिसेंबर 2019 पर्यंत सुरु

Posted On: 23 DEC 2019 6:39PM by PIB Mumbai

मुंबई, 23 डिसेंबर 2019

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क विभागाने आज ‘सबका विश्वास’ या योजनेची माहिती देण्यासाठी मुंबई शेअर बाजारातल्या प्रतिनिधींसाठी मुंबईत परिसंवाद आयोजित केला होता. करदाते सेवा मुंबई विभागाच्या महासंचालनालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

‘सबका विश्वास’ योजनेअंतर्गत गतकाळातील आर्थिक विवादांचे निवारण केले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष, योजनेचे लाभ आणि योजना राबवण्यासाठीची प्रक्रिया याची माहिती शेअर बाजारातल्या प्रतिनिधींना या परिसंवादात देण्यात आली. केंद्रीय अबकारी आणि सेवा कराशी निगडीत सर्व खटल्यांचे निवारण या योजनेअंतर्गत एकाच वेळी करण्यात येत.

या अंतर्गत व्याज दर, दंड आणि शुल्क माफ करणे, कारवाईपासून संरक्षण आणि मागणी केलेल्या शुल्कापासून 40 ते 70 टक्क्यांपर्यंत दिलासा मिळू शकतो. जर स्वेच्छेने शुल्काची माहिती दिली तर कुठलेही व्याज किंवा दंड न भरता केवळ शुल्काची रक्कम भरता येईल. या योजनेअंतर्गत केवळ 30 जून 2019 पर्यंतचीच प्रलंबित प्रकरणे हाताळली जात आहेत. योजना 31 डिसेंबर 2019 पर्यंतच सुरु आहे.

 

 

Source: Directorate General of Taxpayer Services, Mumbai Zonal Unit

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1597270) Visitor Counter : 127


Read this release in: English