पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2019 1:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2019
माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
"आज चौधरी चरणसिंग यांची जयंती. कष्टकरी शेतमजूरांच्या हक्कांना सुरक्षित करण्याविषयीचा मुद्दा निघाला, तर चौधरी चरणसिंग यांची आठवण होणे अटळ आहे. उपेक्षितांना रोजगार मिळावा यासाठी देखील चरण सिंगजी यांनी अविरत कष्ट केले. भारताच्या लोकशाही रचनेला अधिक बळकट करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे", असे पंतप्रधानांनी म्हंटले आहे.
S.Tupe/R.Aghor/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1597200)
आगंतुक पटल : 133
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English