पंतप्रधान कार्यालय

असोचॅमच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्‌घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित


5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट शक्य आहे-पंतप्रधान

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गेल्या 5 वर्षात देशाने मजबूत मूलतत्व विकसित केली

या प्रयत्नांच्या समर्थनार्थ पुढील 5 वर्षात पायाभूत क्षेत्रात 100 लाख कोटी रुपयांची तर ग्रामीण क्षेत्रात 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

कॉर्पोरेट क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी कर आकारणी, श्रम आणि अन्य कायद्यांचे सुलभिकरण केले जात आहे.

Posted On: 20 DEC 2019 5:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2019

 

5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत असोचॅमच्या शतकपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्‌घाटन सत्रात सहभागी झाले होते. यावेळी कॉर्पोरेट जगत राजनैतिक अधिकारी आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याची कल्पना अचानक सूचलेली नाही. गेल्या 5 वर्षात देशाने स्वत:ला इतके मजबूत बनवले आहे की त्याने स्वत:साठी हे उद्दिष्ट केवळ आखले नाही, तर त्या दिशेने प्रयत्न देखिल करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

‘5 वर्षांपूर्वी अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. आमच्या सरकारने ही मंदी केवळ रोखली नाही, तर अर्थव्यवस्थेत शिस्त देखिल आणली.’

‘आम्ही भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले जेणेकरुन शिस्तबद्ध पद्धतीने निश्चित नियमांच्या आधारे ती चालू शकेल. गेल्या अनेक दशकांपासून होत असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या मागण्या आम्ही पूर्ण केल्या आणि 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी मजबूत पाया रचला.’

नियमितीकरण आणि आधुनिकीकरण या दोन मजबूत स्तंभांवर आम्ही भारतीय अर्थव्यवस्था उभी करत आहोत. नियमित अर्थव्यवस्थेच्या क्षितिजामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाशी आम्ही आपली अर्थव्यवस्था जोडत आहोत. जेणेकरुन आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला आम्ही गती देऊ शकू, असे पंतप्रधान म्हणाले.

‘आता नवीन कंपनीच्या नोंदणीसाठी कित्येक आठवड्यांच्या ऐवजी केवळ काही तास लागतात. ऑटोमेशनमुळे सीमेपलिकडील भागांमध्ये वेगाने व्यापार होतो. पायाभूत सुविधांच्या जोडणीमुळे बंदरे आणि विमानतळावरील मालवाहतूक हाताळणीच्या वेळेत बचत झाली आहे आणि ही सर्व आधुनिक अर्थव्यवस्थेची उदाहरणे आहेत.’

‘आत्ताचे आपले सरकार औद्योगिक क्षेत्राचे म्हणणे ऐकतो, त्यांच्या गरजा जाणून घेतो आणि त्यांच्या सूचनांप्रति संवेदनशील आहे.’

शाश्वत प्रयत्नांमुळे व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत भारत लक्षणीय झेप घेऊ शकला, असे पंतप्रधान म्हणाले.

‘व्यवसाय सुलभता हे जरी दोनच शब्द दिसत असले, तरी त्याचे मानांकन सुधारण्यासाठी धोरणात आणि नियमांमधील बदलांसह अनेक प्रयत्न करण्यात आले.’

करदाते आणि अधिकाऱ्यांमधील मानवी संवाद कमी करण्यासाठी देशात चेहराविरहित कर प्रशासनाच्या दिशेने प्रयत्न केले जात असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.

‘कर प्रणालीत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी आपण चेहराविरहित कर प्रशासनाकडे वळत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.’

सरकारने कंपनी क्षेत्रातील अनेक कायदे अवैध ठरवले जेणेकरुन उद्योग क्षेत्राला भयमुक्त वातावरणात कुठल्याही ओझ्याशिवाय काम करता येईल.

‘तुम्हाला माहितच आहे की, कंपनी कायद्यात अनेक तरतूदी आहेत, ज्यानुसार एक छोटीशी चूक फौजदारी गुन्हा ठरू शकते. आमच्या सरकारने अशा अनेक तरतूदी रद्द केल्या आहेत आणि अनेक तरतूदी रद्द करण्याचा प्रयत्न करत आहोत.’

देशात सध्याचा कॉर्पोरेट कर आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे आणि यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

‘सध्याचा कॉर्पोरेट कर हा सर्वात कमी दर आहे म्हणजेच अस सरकार जे सर्वात कमी कॉर्पोरेट कर घेतो, तर ते आमचे सरकार आहे.’

श्रम सुधारणांच्या दिशेने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी माहिती दिली.

तसेच बँकिंग क्षेत्राला अधिक पारदर्शक आणि फायदेशीर बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबतही त्यांनी माहिती दिली.

‘सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे आज 13 बँका नफ्याच्या मार्गावर आहेत. तर 6 बँका पीसीएमधून बाहेर आल्या आहेत. बँकांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला आम्ही गती दिली आहे. आज बँका त्यांचे देशभरातले जाळे विस्तारत आहेत आणि जागतिक ओळख मिळवण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.’

देशातल्या या सर्वांगिण सकारात्मकतेमुळे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असे ते म्हणाले. या उद्दिष्टाच्या समर्थनार्थ सरकार पायाभूत क्षेत्रात 100 लाख कोटी रुपये तर ग्रामीण क्षेत्रात 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 


(Release ID: 1597071) Visitor Counter : 240


Read this release in: English