संरक्षण मंत्रालय
‘पिनाक’ क्षेपणास्त्र यंत्रणेचीडीआरडीओकडून ओदिशात यशस्वी चाचणी
Posted On:
19 DEC 2019 6:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2019
डीआरडीओ म्हणजेच संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेने आज ओदिशातल्या चंडीपूर येथे दुपारी 12 वाजता ‘पिनाक’ या क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी यशस्वी केली. 75 किलोमीटर्सच्या टप्प्यापर्यंत अचूक लक्ष्यभेद करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
‘पिनाक एम के-II’ रॉकेट हे दिशादर्शक आणि नियंत्रण तसेच मार्गदर्शक व्यवस्थेने युक्त असलेले क्षेपणास्त्र आहे. अचूक लक्ष्यभेद तसेच माऱ्याचा टप्पा वाढवण्यासाठी यात सुधारणा करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राला आयआरएनएसएस या दिशादर्शक उपग्रह प्रणालीशी जोडले असून, त्याद्वारे त्याला मार्गदर्शन मिळू शकेल.
आज झालेल्या चाचणीत ‘पिनाक’ने सर्व कसोट्या यशस्वीपणे पार पाडल्या.
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1596991)
Visitor Counter : 173