नौवहन मंत्रालय
राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे जहाज पुनर्प्रक्रिया विधेयकाचे कायद्यात रुपांतर
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2019 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2019
जहाज पुनर्प्रक्रिया विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींनी 13 डिसेंबर 2019 रोजी मंजुरी दिली. आंतरराष्ट्रीय मानकांची स्थापना करून जहाजांच्या पुनर्वापराच्या नियमनासाठी सरकारने हा कायदा केला आहे. जहाजांचे सुरक्षित आणि पर्यावरणाला हानी न पोहचता जहाजांच्या पुनर्वापरासाठी हाँगकाँग आंतरराष्ट्रीय परिषदेच्या घोषणापत्राचे पालन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या कायद्यामुळे जहाजांच्या धोकादायक सामुग्रीचा पुनर्वापर टाळला जाणार आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1596835)
आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English