संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका दौऱ्यात ओसियाना आणि नॉरफॉक या नौदल तळाला दिली भेट

Posted On: 18 DEC 2019 2:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2019

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिका दौऱ्यावर असून काल त्यांनी ओसियाना आणि नॉरफॉक या नौदल तळाला भेट दिली.  अमेरिका-भारत संरक्षण भागीदारी आणि दोन्ही देशांच्या नौदलांमधील दृढ संबंध या दौऱ्याने अधोरेखित केले.

ओसियाना नौदल तळाला दिलेल्या भेटीत संरक्षण मंत्र्यांनी बोईंग मोबाईल फ्लाईट सिम्युलेटर, स्टॅटीक डिस्प्ले आदींची पाहणी केली. भारतीय प्रतिनिधी मंडळाने नॉरफॉक नौदल तळावरील यूएसएस ड्वाईट डी. आयसेनहोवर या निमित्झ श्रेणीच्या विमानवाहू जहाजालाही भेट दिली.

यावेळी राजनाथ सिंह यांच्याबरोबर भारतातले अमेरिकेचे राजदूत हर्ष वर्धन  श्रींगला, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेतील मजबूत सुरक्षा संबंध प्रतिबिंबित झाले असून आगामी काळात हे संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारत आणि अमेरिका लष्करी सराव, संरक्षण व्यापार आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांच्या माध्यमातून संरक्षण सहकार्य यापुढेही कायम राहील.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1596821) Visitor Counter : 114


Read this release in: English