गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारत वंदना उद्यान विकासाचा पायाभरणी समारंभ
नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत लोकांची दिशाभूल, कोणत्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व रद्द होणार नाही-अमित शहा
Posted On:
17 DEC 2019 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2019
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत वंदना उद्यान विकासाचा पायाभरणी समारंभ झाला.
200 एकर जागेत पसरलेल्या या उद्यानाला 550 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे उद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र बनेल, असे ते म्हणाले.
राजकीय लाभ उठवण्यासाठी या मुद्यावरून लोकांची दिशाभूल केली जात असल्याची टीका करत कोणत्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व रद्द होणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. भारतातील एकाही अल्पसंख्यक नागरिकाचे नागरिकत्व रद्द होणार नाही या आश्वासनाना त्यांनी पुनरूच्चार केला. कोणत्याही देशाचे नागरिकत्व नसलेल्या निर्वासितांना सक्षम करण्यासाठी हा कायदा आहे, असेही ते म्हणाले. निर्वासितांना नागरिकत्व देणे हा नेहरू लियाकत कराराचा एक भाग होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 70 वर्षांनी त्याची अंमलबजावणी करत आहे असे शहा यांनी स्पष्ट केले. गेली 70 वर्ष हालअपेष्टा सहन करणाऱ्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
S.Tupe/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1596782)
Visitor Counter : 164