वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उद्योगांनी आयात वस्तूंवरील अवलंबित्व कमी केलेच पाहिजे-पियुष गोयल


व्यापार आणि उद्योग मंत्र्यांच्या हस्ते निर्यात शिखर परिषद 2019 चे उद्‌घाटन

Posted On: 17 DEC 2019 6:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2019

 

भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने आयोजित केलेल्या निर्यात शिखर परिषद 2019 चे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्‌घाटन झाले. जागतिक मूल्य साखळ्यांचा फायदा घेण्यासाठी भारतीय उद्योग सक्षम झालेच पाहिजेत असे त्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्र अधिक स्पर्धात्मक होण्यासाठी सरकार आणि उद्योग जगताने एकत्र कार्य करण्यावर त्यांनी भर दिला. परदेशी गुंतवणूकदारांना राज्यस्तरीय धोरणांबाबत अधिक माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक दूतावासात भारतातील राज्यांचा प्रतिनिधी असलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारीमधून भारताने माघार घेतली असली तरी युरोपियन युनियन, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये भारतीय निर्यातीला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने अधिक पावले उचलली आहेत, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

 

S.Tupe/J.Patankar/P.Kor


(Release ID: 1596771)
Read this release in: English