दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रीय ब्रॉडबॅण्ड मोहिमेचा शुभारंभ

2022 पर्यंत देशातली सर्व खेडी जोडणार

Posted On: 17 DEC 2019 6:05PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2019

 

राष्ट्रीय ब्रॉडबॅण्ड मोहिमेमुळे लोकांच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतील आणि डिजिटल दूरसंवाद पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार होईल असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. ते आज राष्ट्रीय ब्रॉडबॅण्ड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंवाद राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते.

रवी शंकर  प्रसाद यांच्या हस्ते यावेळी राष्ट्रीय ब्रॉडबॅण्ड मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.

या मोहिमेअंतर्गत डिजिटल संपर्काच्या पायाभूत सुविधा, डिजिटल सक्षमीकरण आणि परवडणाऱ्या दरातील सर्वांना उपलब्ध होणारे ब्रॉडबॅण्ड यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. सर्वसमावेशक आणि सहज उपलब्धता यावर या मोहिमेत मुख्यत्वेकरून भर देण्यात आला आहे.

  • सर्व गावांत 2020 पर्यंत ब्रॉडबॅण्डची उपलब्धता
  • देशभरात विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागात ब्रॉडबॅण्ड सेवेची सार्वत्रिक उपलब्धता
  • 30 लाख कि.मी. लांबीच्या ऑप्टीकल फायबर केबलचे जाळे तयार करणे आणि 2024 पर्यंत प्रति हजार लोकसंख्येमागे टॉवरची संख्या वाढवणे
  • मोबाईल आणि इंटरनेट सेवांच्या दर्जात लक्षणीय सुधारणा

S.Tupe/J.Patankar/P.Kor(Release ID: 1596762) Visitor Counter : 123


Read this release in: English