संरक्षण मंत्रालय
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्ती
Posted On:
17 DEC 2019 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2019
लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ते सध्या उप लष्कर प्रमुखपदी कार्यरत आहेत. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत येत्या 31 डिसेंबर 2019 रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर 31 डिसेंबर 2019 रोजी लेफ्टनंट जनरल नरवणे लष्करप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतील.
नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत झाले. नॅशनल डिफेन्स अॅकेडमी आणि इंडियन मिलिटरी अॅकेडमीचे माजी विद्यार्थी असलेले नरवणे यांची सिख लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये जून 1980 मध्ये नियुक्ती झाली. सध्या ते त्यांच्या डॉक्टरेटवर काम करत आहेत.
4 दशकांच्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी पूर्वोत्तर भारत, जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. तसेच ‘ऑपरेशन पवन’ दरम्यान ते भारतीय शांती सेनेमध्येही कार्यरत होते. नवी दिल्लीतल्या संरक्षण मंत्रालयाच्या एकीकृत मुख्यालयातही ते कार्यरत होते. 1 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांनी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
S.Tupe/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1596713)
Visitor Counter : 278