आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
स्तन्य दुग्ध बँका
Posted On:
13 DEC 2019 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2019
“सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्तनपान व्यवस्थापन केंद्रे स्थापन करण्याच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनां” नुसार, भारतातील स्तनपान बँका ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह लेक्टेशन मॅनेजमेंट सेंटर’ (सीएलएमसी) आणि ‘लेक्टेशन मॅनेजमेंट युनिट’ (एलएमयू) म्हणून ओळखल्या जातात.
सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्तनपान व्यवस्थापन केंद्रांच्या उभारणीविषयीच्या तांत्रिक मार्गदर्शनासह राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना सामायिक केल्या आहेत; तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांना यासाठी अर्थसहाय्य पुरवले जाते.
आरोग्य केंद्रातील सेवा देणाऱ्यांचा प्रयत्न म्हणजे स्तनपानाच्या नैसर्गिक कृतीचे जतन करणे. स्तनपान केंद्रे उभी करताना कोणत्याही प्रकारे आईच्या दुधाचे किंवा स्तनपान देण्याच्या कृतीचे महत्त्व कमी करण्याचा हेतू नाही. जर आईचे स्वतःचे दूध अपुरे असेल किंवा कोणत्याही अपरिहार्य कारणास्तव उपलब्ध नसेल तर, ही दरी भरून काढण्यासाठी ‘डोनर ह्यूमन मिल्क’ (डीएचएम) हा पर्याय आहे.
राज्यमंत्री (आरोग्य व कुटुंब कल्याण), अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
M.Chopade/S.Pophale/P.Malandkar
(Release ID: 1596410)
Visitor Counter : 189