मंत्रिमंडळ
विजेच्या पूर्तीसाठी सहकार्य करण्यासाठी भारत आणि जपान कोळसा ऊर्जा केंद्र यांच्यामध्ये केलेल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची स्वीकृती
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2019 9:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विजेच्या पूर्तीसाठी सहकार्य करण्यासाठी भारत आणि जपान कोळसा ऊर्जा केंद्र यांच्यामध्ये केलेल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची स्वीकृती देण्यात आली.
भारत आणि जपान कोळसा ऊर्जा केंद्र यांच्या दरम्यान झालेल्या या सहकार्य करारामुळे भारताला सातत्याने, स्थिर आणि कमी कार्बन उत्सर्जन करणारा औष्णिक प्रकल्प विकसित करण्यामध्ये येत असलेल्या अडचणींवर मात करता येणार आहे. यासाठी जपानच्या मदतीने आवश्यक अभ्यास करणे, ज्ञानाची, माहितीची देवाण-घेवाण करणे शक्य होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांची भारत सरकार वेगाने अंमलबजावणी करणार आहे.
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1596105)
आगंतुक पटल : 167
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English