मंत्रिमंडळ

नादारी आणि दिवाळखोरी कायदा (द्वितीय दुरुस्ती) विधेयक, 2019 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 11 DEC 2019 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज नादारी आणि दिवाळखोरी संहिता (द्वितीय दुरुस्ती) विधेयक, 2019 च्या माध्यमातून नादारी आणि दिवाळखोरी संहिता, 2019 मध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. या सुधारणा, दिवाळखोरीच्या ठराव प्रक्रिये दरम्यान येत असलेल्या काही अडचणी दूर करणे  तसेच  नियमामधील क्लिष्टता  दूरकरण्यासाठी  तसेच व्यवसायामध्ये सुलभता आणण्यासाठी  आहे.

 

प्रस्तावाचा तपशील:

नादारी आणि दिवाळखोरी कायदा, 2016 (नियम) मध्ये दुरुस्ती विधेयक कलम 5 (12), 5 (15), 7, 11, 14, 16 (1), 21 (2), 23 (1), 29 ए, 227, 239, 240 मध्ये सुधारणा करण्याचा आणि 32 अ हे नवीन कलम समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

प्रभाव:

अडथळे दूर करण्यासाठी संहितेतील दुरुस्ती, सीआयआरपी सुलभ करणे आणि शेवटच्या मैलाच्या निधीचे संरक्षण यामुळे आर्थिक विस्कळीत क्षेत्रातील गुंतवणूकीस चालना मिळेल.

कॉर्पोरेट कर्जदारांच्या व्यवसायाचा पाया हरवला नाही याची खात्री करुन घेत आणि स्थगिती कालावधीत परवाने, परवानग्या, सवलती, मंजुरी इत्यादी निरस्तीकरण किंवा निलंबित करणे किंवा नूतनीकरण करणे अशक्य आहे.

मागील व्यवस्थापन / प्रवर्तकांनी केलेल्या गुन्ह्यांविरूद्ध फौजदारी कारवाईतून यशस्वी ठराव अर्जदाराच्या बाजूने करणे.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1596104) Visitor Counter : 137


Read this release in: English