पंतप्रधान कार्यालय
सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2019 1:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे.
“माननीय सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करतो. ‘महाकवी भरतियार’ म्हणून प्रसिद्ध झालेले भारती, देशभक्ती, सामाजिक सुधारणा, काव्यप्रतिभा आणि निर्भयता यांचे प्रतीक आहेत. त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला कायम प्रेरणा देत राहिल.
सुब्रमण्यम भारती यांचा सर्वाधिक विश्वास न्याय आणि समानतेवर होता. त्यांनी एकदा म्हटले होते, ‘एका व्यक्तीची जरी उपासमार होत असेल तर आम्ही संपूर्ण जग नष्ट करु’. माणसाचे दु:ख कमी करण्यासाठी आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठीचा त्यांचा दृष्टिकोन यातून दिसून येतो.” असे पंतप्रधान म्हटले आहे.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1595855)
आगंतुक पटल : 168
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English