वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जपानच्या व्यापार आणि उद्योग मंत्र्यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची घेतली भेट
Posted On:
10 DEC 2019 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2019
जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री हिरोशी काजियामा यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात येत्या 16 तारखेला गुवाहाटी इथे चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गोयल आणि काजियामा यांची भेट झाली.
सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत भारत आणि जपान यांच्यातल्या द्विपक्षीय मुद्यांवर विचारविनिमय करण्यात आला. गोयल यांनी भारत आणि जपान दरम्यानच्या व्यापारी तुटीचा मुद्दा, सर्वंकष आर्थिक भागिदारी कराराचा आढावा हे विषय उपस्थित केले.
सर्व भागीदारांसमवेत संतुलित व्यापाराला भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे गोयल यांनी जपानच्या मंत्र्यांना सांगितले. त्याचवेळी भागिदारी देशांमधे भारतीय वस्तू आणि सेवांना प्रवेशाची संधी महत्वाची आहे. मात्र सीईपीएमधे कटिबद्धता दर्शवल्यानंतरही भारतीय वस्तू आणि सेवांसाठी बाजारपेठेत प्रवेशाची संधी कठीण राहिली आहे. या सर्व मुद्यांची दखल घेत भारत-जपान व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दोन्ही मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1595776)