माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आठव्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांची फोटो प्रभागाने केली घोषणा

Posted On: 07 DEC 2019 3:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2019

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील  फोटो प्रभाग, पत्र सूचना कार्यालयाने 8 व्या राष्ट्रीय  छायाचित्रण पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागवल्या आहेत.

प्रभाग दरवर्षी छायाचित्रणाच्या माध्यमातून कला, संस्कृती, विकास, वारसा, इतिहास, जीवन, लोक, समाज आणि परंपरा यांसारख्या विविध पैलूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यावसायिक तसेच नवोदित छायाचित्रकारांना  प्रोत्साहित करण्यासाठी हे पुरस्कार देतो..

राष्ट्रीय छायाचित्रण  पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात- जीवनगौरव पुरस्कार, व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी पुरस्कार आणि नवोदित छायाचित्रकारांसाठी  पुरस्कार

जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप तीन लाख रुपये रोख असे आहे.

व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी यावर्षीची संकल्पना  'जीवन आणि जल' अशी आहे. व्यावसायिक श्रेणी अंतर्गत पुरस्कार एक लाख रुपये रोख रकमेसह ‘वर्षाचा व्यावसायिक फोटोग्राफर’ पुरस्कार आणि प्रत्येकी 50  हजार रुपयांचे पाच विशेष उल्लेखनीय पुरस्कार दिले जाणार आहेत.

नवोदित छायाचित्रकारांसाठी यावर्षीची संकल्पना  'भारताचा सांस्कृतिक वारसा " अशी आहे.  नवोदित श्रेणी अंतर्गत  75 हजार रुपये रोख रकमेसह 'वर्षातील नवोदित छायाचित्रकार"  पुरस्कार आणि प्रत्येकी  30 हजार रुपयांच्या रोख रकमेचे पाच विशेष उल्लेखनीय पुरस्कार दिले जाणार आहेत.

8 व्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्वे आणि नोंदणी अर्ज photodivision.gov.in आणि pib.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

S.Tupe/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1595409) Visitor Counter : 128


Read this release in: English